शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिला डब्यात घुसाल तर तुरूंगवास : रेल्वे प्रशासनाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 18:53 IST

कामानिमित्त लोकलमधून प्रवास करताना यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

ठळक मुद्देपुरूष प्रवाशांवर होणार कारवाईपुणे ते लोणावळा मार्गावर दररोज सुमारे ४२ लोकल विद्यार्थिनी, नोकरदार महिला,मजुरी करणाऱ्या महिला लोकलचा मोठ्या प्रमाणावर वापर

पुणे : लोणावळा लोकलच्यामहिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या पुरूष प्रवाशांना आता दंडात्मक कारवाईसह तुरूंगवासही होऊ शकतो. यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे ते लोणावळा मार्गावर दररोज सुमारे ४२ लोकल धावतात. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. विद्यार्थिनी, नोकरदार महिला,मजुरी करणाऱ्या महिला लोकलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे या गाड्यांमध्ये महिलांसाठी एक डबा आरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामधून पुरूषांना प्रवास करता येत नाही. महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या विशेष डब्ब्यांमधून अनेकदा पुरूष प्रवासीही प्रवास करत असल्याचे सातत्याने दिसून येते. त्यासाठी डब्ब्यांमध्ये महिला पोलिसही ठेवले जातात. पण त्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही. पुरूषांची घुसखोरी सुरूच असल्याच्या तक्रारी महिलांकडून केल्या जात आहेत. महिलांच्या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी आढळून आल्यास सध्या त्यांना पकडून खाली उतरविले जाते. पण आता पुढील काळात संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईबरोबरच तुरूंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.महिलांच्या सुविधेसाठी विशेष डब्ब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी विशेष असा उल्लेख डब्यांवर करण्यात आलेला आहे. तसेच स्थानकांवर त्याबाबत उद्घोषणाही केल्या जातात. मात्र, त्यानंतरही पुरूष प्रवाशांची घुसखोरी सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळात पुरूषांनी या डब्ब्यांमधून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेlocalलोकलrailwayरेल्वेWomenमहिला