शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अग्रक्रम :  नवलकिशोर राम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 12:59 IST

भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यात येईल. यात शेतकऱ्यांना मान्य असा प्रस्तावच घेतला जाईल. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी मोबदला ठरविताना घेण्यात येईल.

ठळक मुद्देसात दिवसांत शेतकऱ्यांना देणार मोबदल्याचा प्रस्तावभूसंपादनामुळे ११८ कुटुंबांची घरे बाधित होणार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती प्रमाणे स्वच्छ आणि सुंदर प्रशासनावर भरप्रत्येक नागरिकाला भेट देणार, नागरिकांसाठी तक्रार 

पुणे : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला अग्रक्रम देण्यात येणार असून येत्या सात दिवसांत शेतकºयांना मोबदल्याचे पर्याय दिले जातील. त्यानंतरच त्यांची संमती घेतली जाईल. शेतकऱ्यांना मान्य होईल अशा प्रस्तावावरच विचार होईल, असे नवनियुक्त जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, शहराच्या मानाने पुण्यात योग्य विमानतळ नाही. गेल्या दहा वर्षांपासून पुणे विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे विमानतळाच्या प्रश्नाला प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहे. विमानतळासाठी जवळपास तेवीसशे हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे. भविष्यातील मागणीनुसार आणखी जमीन लागण्याची शक्यता आहे. भूसंपादनामुळे ११८ कुटुंबांची घरे बाधित होणार आहेत. प्रकल्प बाधितांना मोबदला देण्यासाठी २०१३चा कायदा आणि २०१५ चा अध्यादेश समोर ठेऊन विचार करण्यात येणार आहे. कायद्यानुसार दर निश्चिती करणे अथवा अध्यादेशानुसार थेट जमीन खरेदी करणे आणि पुनर्वसन असे पर्याय आहेत. शेतकऱ्यांना आपल्याला काय मिळणार हे समजायला हवे. त्यासाठी येत्या ७ ते आठ दिवसांत मोबदल्याचे पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात येतील. त्यानंतरच भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यात येईल. यात त्यांना मान्य असा प्रस्तावच घेतला जाईल. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी मोबदला ठरविताना घेण्यात येईल. त्याबाबत एप्रिल अखेरीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येण्यात येईल. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत भूसंपादन प्रक्रियेतील अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे राम म्हणाले. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन, पाणी वाटप नियोजन, सात-बारा संगणकीकरण, जलयुक्त शिवार या कामांवर विशेष भर दिला जाईल. जिल्ह्यात जमिनीच्या नोंदणीची सुमारे १४ लाख प्रकरणे आहेत. या सर्वांचे संगणकीकरण करणे आव्हान आहे. त्यात हवेली तालुक्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या प्रणालीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकर तोडगा काढला जाईल.  

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळNavalkishor Ramनवलकिशोर राम