मंचरला दारूअड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:23+5:302021-01-08T04:31:23+5:30

मंचर: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथे दोन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये २८ हजार ७३९ रुपये किमतीची दारू व ...

Print Manchar at the bar | मंचरला दारूअड्डयावर छापा

मंचरला दारूअड्डयावर छापा

मंचर: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथे दोन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये २८ हजार ७३९ रुपये किमतीची दारू व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची गाडी जप्त केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी पोलीस जवान सुदर्शन माताडे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लोणी पाबळ रस्त्यावरील हॉटेल संग्राममवर कारवाई करण्यात आली. या वेळी पोलिसांनी बिगर परवाना ११ हजार २९० रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी राजाराम येधु आदक (रा. लोणी ता.आंबेगाव) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याच परिसरात असणाऱ्या होटेल शिवांश जवळ मोटारीत अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचे आढळून आले होते. या कारवाईमध्ये १७ हजार ४४९ रुपये किमतीची दारू व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहन जप्त केली आहे. याप्रकरणी प्रकाश लालजी शिल्ल, बबळ कुमार शाहू, विजय कुमार सिंग,राकेश अशोक पडवळ (सर्व रा. लोणी ता.आंबेगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तानाजी हगवणे करत आहेत.

Web Title: Print Manchar at the bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.