प्रचार्य मच्छिंद्र माने यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:49+5:302021-01-08T04:31:49+5:30
प्राचार्य माने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व शिक्षकांनी त्यांना अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. ...

प्रचार्य मच्छिंद्र माने यांचा सत्कार
प्राचार्य माने यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व शिक्षकांनी त्यांना अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. तर, माने यांनी शाळेला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोल, अध्यक्ष भास्करराव पुंडे, तानाजी खर्डे, बाबूराव दळवी, लहू तळोले, शहाजी दळवी, विजय तळोले, कवी दत्तात्रय जगताप, आष्टी तालुक्याचे कृषी अधिकारी सुपेकर. प्राचार्य बेनके, प्राचार्य बर्वे, बी डी पुंडे, पिराजी माक, राजू ननवरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अनिल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले. अविनाश दौंडकर यांनी आभार मानले.
--
फोटो ०६ कान्हूरमेसाई प्राचार्य
फोटो ओळी : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र माने यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करताना विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ.