शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान बदलायचे आहे..." शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘चारसो के पार’ हा नारा देत आहेत. त्यांना एवढ्या मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे...

सासवड (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने हा देश चालवत आहेत, ते पाहिल्यानंतर चिंता वाटते. देशातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीने देशाचा कारभार चालवणं, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, सध्याचे चित्र वेगळे आहे.

स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर राज्यकर्त्यांना पुढे जाऊन विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका देखील न घेण्याची दुर्बुद्धी सुचू शकते आणि ते चित्र सध्या देशामध्ये दिसत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘चारसो के पार’ हा नारा देत आहेत. त्यांना एवढ्या मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे. कारण, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान बदलायचे आहे. याबाबतच्या टीका झाल्यानंतर ते संविधान बदलणार नाही, असं सांगतात. मात्र, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील भाजपचे खासदार आम्हाला देशाची घटना बदलायची आहे. त्यासाठी ४०० खासदारांचा आकडा हवा आहे, अशी वक्तव्ये करत आहेत. यातून लोकशाही किती धोक्यात आहे, याची प्रचिती या भाषणातून येत असून त्यामुळे या निवडणुकांमध्ये काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात आहेत. ते महाराष्ट्रात आल्यानंतर ते आमची आठवण काढतात, आमच्यावर टीका-टिप्पणी करतात. उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा आहे. तुम्ही त्यांचं भाषण ऐका पुण्यात आल्यानंतर ते भाषणाची सुरुवात पुणेकरांना माझा नमस्कार, असं म्हणून करतील. त्यानंतर ते मराठीमध्ये एक-दोन वाक्य म्हणतील आणि त्यानंतर त्यांना शरद पवारांची आठवण येईल, अशी खोचक टीका शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली. सासवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार समाचार घेतला.

उद्धवसेना नेते खा. संजय राऊत, पुरंदरचे आमदार संजय जगताप, शिरूरचे आमदार अशोक पवार, उद्धवसेना नेते आमदार सचिन आहीर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, शंकरनाना हरपळे, संभाजीराव झेंडे, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, विजय कोलते, सुदामराव इंगळे, दिलीप बारभाई, अभिजित जगताप, दत्तात्रय कड, सुनीता कोलते, गौरी कुंजीर, पुष्कराज जाधव, बाळासाहेब भिंताडे, राहुल गिरमे, बंडूकाका जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४