शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौरा | तळवडे ते देहूगाव दरम्यानच्या रस्त्यांवर 'ट्रॅफिक जॅम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:34 IST

सकाळपासून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी...

पिंपरी: श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  येणार आहेत. दुपारी दोन तास पंतप्रधान देहूत असणार आहे. पंतप्रधानांच्या देहू दौऱ्यामुळे गावात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व रस्त्यांची वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

पुणे-मुंबई महामार्गावरील देहू फाटा ते देहू रोड फाटा ते देऊळगाव दरम्यानचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. वारकऱ्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी निगडी रुपीनगर तळवडे, तसेच आळंदीकडून मोशी, चिखली तळवडे मार्गे रस्ता खुला ठेवला होता. आज सकाळी १० वाजल्यापासून  तळवडेपासून ते विठ्ठलवाडी पेट्रोल पंपापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले.  भर उन्हात वारकऱ्याचा पायी प्रवासविठ्ठलवाडीच्या अलीकडे वाहनतळाची निर्मिती करण्यात आलेली असून सभेसाठी आलेल्या नागरिकांना वारकऱ्यांना कार्यक्रम तळापासून अलीकडेच वाहने लावे लागत आहे. त्यानंतर तेथून सभास्थानाकडे जाण्यासाठी पीएमपीएमएलच्या बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच वाहनतळाच्या शेजारी शेजारी वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्थाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कडेकोट बंदोबस्त पंतप्रधान देहूत येत असल्याने आज सकाळपासूनच सकाळपासूनच देहूतील सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तळवडे मार्गे देहू गावात वारकऱ्यांना येण्याची सोय करण्यात आली आहे. या रस्त्यावरही कॅपजेमिनी चौक तसेच विठ्ठलवाडी चा अलीकडील चौकामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. या ठिकाणी वाहनांना अडवण्यात येत होते.

स्थानिकांची झाली अडचणपंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहू गावात येणाऱ्या नागरिकांची नागरिकांची तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. तळवडेकडील केपजेमिनी चौका पासूनच नागरिकांना अडविण्यात येत होते. त्यामुळे विठ्ठलवाडी तळवडे काळोखे मळा या परिसरात राहणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी दहा वाजल्यापासूनच दुपारी तीन वाजेपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdehuroadदेहूरोड