शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'देशातील गोरगरिबांसाठी काम करणारे पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी', देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:52 IST

श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे

पुणे : श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीदेहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांचे देहूत आगमन झाले आहे. देहूत मोदींचे जंगी स्वागत झाले आहे. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी देहूत दाखल झाले आहेत. पंतप्रधानांचा उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे भरभरून कौतुक केले. संतांप्रमाणे मोदींनी समाजसेवेला सुरुवात केली असून गोरगरिबांसाठी काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेपण खरे वारकरी आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात कर्मकांड सुरु होता. लोकांचे शोषण चालू होते. त्यावेळी भागवत धर्माचा पताका हातात घेऊन संत तुकाराम महाराजांनी समाजसेवेला सुरुवात केली. भजन, कीर्तने यामधून त्यांनी जनजागृती केली. त्याप्रमाणे मोदी आपल्या देशासाठी कार्य करत आहेत. लोकांसाठी आणि रंजल्यागांजल्यासाठी काम करणारे पंतप्रधान आपले खरे वारकरी आहेत. जे काम संतानी समाजासाठी केले. ते पंतप्रधान करत आहेत. भागवत धर्माचा विचार मोदींनी संतांप्रमाणेच सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. जगभरात त्यांनी आपल्या संतांचे विचार पोहोचवले आहेत.  

टॅग्स :dehuदेहूsant tukaramसंत तुकारामNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस