जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रच आजारी; ७७७ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:11 IST2021-02-10T04:11:06+5:302021-02-10T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण आरोग्यावर भर देत यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ...

The primary center in the district is sick; 777 posts vacant | जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रच आजारी; ७७७ पदे रिक्त

जिल्ह्यातील प्राथमिक केंद्रच आजारी; ७७७ पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण आरोग्यावर भर देत यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अनेक पदे रिक्त असल्याने मोजक्याच लोकांवर आरोग्य यंत्रणेचा भार आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ७७७ तर उपकेंद्रात १०७ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने ती सलाईनवर असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ५३९ उपकेंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरवली जाते. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या आरोग्य केंद्रातील उपचारांवरच अवलंबून आहेत. यंदा कोरोनाकाळात आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली. असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्रातील रिक्त पदे भरली न गेल्याने त्याचा ताण मोजक्याच आरोग्य कर्मचाऱ्यांवर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात १८४५ मंजूर आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचारिका आदी पदे आहेत. मात्र, यातील केवळ ८५३ पदेच भरली गेली आहेत, तर उपकेंद्रात ११३८ पदे मंजूर आहेत. यातील १०७ पदे ही रिक्त आहेत. राज्य शासनाच्या महापोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, अद्याप याला सुरुवात झालेली नाही. यामुळे ही पदे कधी भरली जाणार या प्रतीक्षेत आरोग्य यंत्रणा आहे.

चार आरोग्य केंद्रांत डॉक्टरच नाहीत

जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे येथील नागरिकांना खाजगी आरोग्यसेवेवर अवलंबून राहावे लागते. परिणामी त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. एखादा गंभीर रुग्ण केंद्रावर आल्यास त्याला तातडीची आरोग्यसेवा मिळत नाही. पर्यायाने त्यांना दुसऱ्या केंद्रात तर काही घटनांमध्ये थेट पुण्यातील दवाखाने गाठावे लागते.

कोट

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे राज्य शासनामार्फत महापोर्टलवरून भरली जातात. ही रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही पदे भरली जातील.

- भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

--------

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र

९६

एकूण कर्मचारी - ८५२

रिक्त पदे - ७७७

उपकेंद्र - ५३९

एकूण कर्मचारी - ११३८

रिक्त - १०७

-------------

Web Title: The primary center in the district is sick; 777 posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.