आळंदीत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST2021-07-24T04:07:51+5:302021-07-24T04:07:51+5:30

यामधील समृद्धी आंधळे व स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनींनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. ...

Pride of meritorious students of class X in Alandi | आळंदीत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आळंदीत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

यामधील समृद्धी आंधळे व स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनींनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा आयकॉन क्लासेसच्या वतीने रोख ११ हजार १११ रुपये बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच ९७ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रा. हरीश जगताप यांनी कठीण परिश्रम, सातत्य, संघर्ष, त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ व गुरुजनांचे मार्गदर्शन याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन गिलबिले, दिनेश घुले, ज्ञानेश्वर रायकर, शैला तापकीर, अविनाश तापकीर, राहुल सोमवंशी, विपुल तापकीर, रामभाऊ कांबळे, उमेश गिलबिले, भाऊसाहेब कोळेकर, सचिन सोळंकर, प्रशांत जगताप, वैभव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Pride of meritorious students of class X in Alandi