मालुसरे, कंक यांच्या वंशजांचा गौरव
By Admin | Updated: December 26, 2016 02:52 IST2016-12-26T02:52:50+5:302016-12-26T02:52:50+5:30
पश्चिम महाराष्ट्र युवा मंचाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे आणि सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांचा गौरव करण्यात आला.

मालुसरे, कंक यांच्या वंशजांचा गौरव
पिंपरी : पश्चिम महाराष्ट्र युवा मंचाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे आणि सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड व पुणे येथे स्थायिक असलेल्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील युवकांनी पश्चिम महाराष्ट्र युवा मंचाची स्थापना केली आहे. मंचाच्या उद्घाटनानिमित्त निगडी, प्राधिकरणातील संत तुकाराम उद्यानाजवळ शनिवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे होते.
माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर शरद मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, प्रतिभा भालेराव, अश्विनी चिखले, शारदा बाबर, मंचचे संस्थापक सुनील जाधव उपस्थित होते. सुभाष राणे (क्रीडाभूषण), सोमनाथ शिंदे (कामगारभूषण), हरि पवार (सहकारभूषण), शिवाजी माने (सांगलीभूषण), धीरज शिंदे (सोलापूरभूषण), विजयकुमार ठुबे (अहमदनगरभूषण), दामोदर मगदूम (कोल्हापूरभूषण), समीर
शिंगटे (साताराभूषण), नीलेश गावडे (पिंपरी-चिंचवडभूषण) यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.(प्रतिनिधी)