कलाशिक्षक सतीश कवाणे यांचा गौरव

By Admin | Updated: February 2, 2016 00:51 IST2016-02-02T00:51:00+5:302016-02-02T00:51:00+5:30

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे नुकताच करण्यात आला. तसेच, गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला

Pride of Artist Satish Kawane | कलाशिक्षक सतीश कवाणे यांचा गौरव

कलाशिक्षक सतीश कवाणे यांचा गौरव

पिंपरी : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे नुकताच करण्यात आला. तसेच, गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारमिळाल्याबद्दल लाल बहादूर शास्त्री स्कूलचे कला शिक्षक सतीश कवाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष ब्रिगेडीयर अनुराग भसीन यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. या वेळी बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, नगरसेवक मनीष आनंद, कमलेश चासकर, दुर्योधन भापकर, अभय सावंत, नगरसेविका पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, वैशाली पहिलवान आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यात श्रीनाथ सावंत, आनंद आपटे, दिलीप पांडकर, फैयाज युसूफ शेख, डॉ. कपील ढेरे (वॉर्ड एक), प्रेमचंद खंडागळे, दिलीप धरोडे, प्रेमकुमार जावळे, अझर खान, सरस्वती पिल्ले (वॉर्ड दोन), महंमद कादरी, प्रभा माटे, शिला डावरे, भानुदास केरकर, अक्षय गरसुंद (वॉर्ड तीन), मेजर डॉ. तारा आगरवाल, श्यामसुंदर साठे, रूपाली त्रिपाठी, डॉ. संजय आवळे, विशाल पिल्ले (वॉर्ड चार), अर्चना मोरे, प्रिती गोठे, शेहनाज शेख, शांता चव्हाण, प्रसाद तांबे (वॉर्ड पाच), सिद्धार्थ गायकवाड, कविता तावरे (वॉर्ड सहा), जयराम कांबळे, ररूल खान, आनंदा साठे, मंगला देसाई, अहमद सय्यद अली (वॉर्ड सात), प्रकाश भोसले, अब्दुल कादर शेख, गोपीचंद परदेशी, अरूण पवार, किशोर अलकुर (वॉर्ड आठ) यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव झाला.
कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे झालेल्या जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे मार्गदर्शक मिलिंद कांबळे, तांत्रिक अधिकारी विजय बेगळे, सुनील शिवले, चंद्रकांत पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पवार, जगन्नाथ लकडे, दत्तात्रय जायभाय, रामदास कुदळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, किशोर मनतोडे, राजेश माने, सिद्धार्थ गायकवाड, हरीश शर्मा, पाडुरंग सरोदे, अमोल शहारे (पत्रकारीता) यांचा गौरव करण्यात आला. कॅन्टोन्मेंटचे कला शिक्षक कवाणे, तसेच लोकमान्य टिळक स्कूलचे शिक्षक मुकुंद केमसे, कर्मचारी जनाबाई लोणारे, बबन शेळके, डी. टी. सोळवंडे, आर. एस. कंकनाला, सदाशिव वाघमारे, सीताबाई अवघडे, सोनी कोकर, कलावती रास्ते, प्रमोत आल्हाट, उषा पवार, स्वप्निल देशमुख, रामभाऊ जगताप यांचा गौरव करण्यात आला.
मुख्याधिकारी जगताप यांनी स्वागत केले. स्मिता साळुंके यांनी सुत्रसंचालन केले. कार्यालय अधीक्षक सुजा जेम्स यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Pride of Artist Satish Kawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.