दौंडला पालेभाज्यांचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:38+5:302021-07-14T04:14:38+5:30
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांचे भाव घसरले, तर केडगाव ...

दौंडला पालेभाज्यांचे भाव घसरले
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांचे भाव घसरले, तर केडगाव येथे भुसार मालाचे भाव स्थिर निघाले. कांद्याच्या भाव तेजीत होते. केडगाव बाजारात कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले. टोमॅटो, भोपळा, काकडी, कोबी यांची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले. मिरची , कारली, भेंडी, गवार, दोडका, वांगी, शिमला मिरची या भाजीपाल्याच्या आवकेत थोडीशी वाढ झाली, मात्र याचा बाजारभावावर तुरळक परिणाम होऊन बाजारभाव किंचितसे वाढले होते. उपबाजार केडगावला कांद्याची आवक स्थिर झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले, तर भुसार मालाच्या आवकेसह बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती : भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २५३ ) ५० ते १००, वांगी ( ५७ ) १०० ते २००, दोडका ( ४७ ) १०० ते २००, भेंडी ( ३९ ) १०० ते २००, कार्ली ( २८ )२०० ते ५०० , हिरवी मिरची ( ९२ ) १०० ते ३००, गवार ( ४५ ) १००ते ३००, भोपळा ( ४२ ) २५ ते ५० , काकडी ( ६५ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ५१ ) १०० ते २२० , कोबी ( ३१० गोणी ) ४०० ते ६०० ,१०० ते २००, कोथिंबीर (१०८९० जुडी) ३०० रुपये शेकडा ते १००० शेकडा, मेथी (२८१०जुडी ५०० ते १००० शेकडा.
शेतीमालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू. ( ३७४ ) १६०० ते १९०० , ज्वारी ( ५६ ) ,१२५० ते १६७५ , बाजरी ( १३ ) १३५० ते १८००, हरभरा ( ७ ) ३८०० ते ४१००
केडगाव : गहू (४४५ ) १७१० ते १९०१ , ज्वारी , ( ३०५ ) १५५० ते २७५०, बाजरी ( ३८१ ).१३५० ते १७०१, हरभरा ( ८५ ) ४००० ते ४४००, मका लाल पिवळा ( १५ ) १७५१ ते १९००, मुग ( २९ ) ४५०० ते ६००० , ,लिबू ( २३७ डाग ) १३०. ते ३१६, कांदा )( ५०००. क्विंटल ) ६०० ते २२००
पाटस बाजार :गहू ( १०७ ),१६५१ ते २०२१, ज्वारी ( २ ) १३०० ते १५००, हरभरा ( ५ )३७०० ते ४२००, बाजरी ( ४२ ) १३०० ते २०५१ , मका ( ३ ) १५५१ ते १८००, तूर ( १ ) ५२०० ते ५२००.