कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, पालक, पुदीनाचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST2021-09-06T04:12:53+5:302021-09-06T04:12:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची एक लाख ३० हजार जुड्यांची, तर मेथीची ५० हजार ...

Prices of cilantro, fenugreek, shepu, chakwat, spinach and mint increased | कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, पालक, पुदीनाचे भाव वाढले

कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, पालक, पुदीनाचे भाव वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची एक लाख ३० हजार जुड्यांची, तर मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली. पालेभाज्यांचे भाव वाढले असून, यात मेथी, कोथिंबीर, शेपू, चाकवत, पुदीना आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे. करडई आणि चवळईच्या भावात घट झाली आहे, तर कांदापात, अंबाडी, मुळे, राजगिरा आणि चुक्याचे भाव स्थिर होते.

घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी ३ ते ११ रुपये, तर किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांना विक्री केली जात होती. मेथीची घाऊक बाजारात ६ ते १२ रुपये, तर किरकोळ बाजरात १० ते २० रुपयांना विक्री केली जात होती.

पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी)

कोथिंबीर : ३०० -११००, पालक: ६००-८००, शेपू : ३००-६००, कांदापात : ४००-७००, मेथी : ६००-१२००, चाकवत : ६००-७००, करडई : ३००-५००, अंबाडी ५००-६००, मुळे : ७००-१०००, पुदीना १००-३००, राजगिरा : २००-४००, चुका ५००-८००, चवळई : ३००-५००.

Web Title: Prices of cilantro, fenugreek, shepu, chakwat, spinach and mint increased