शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे दर वाढल्याने संकरित गाईंना आला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:56 IST

जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्यांची पसंती

ठळक मुद्देगाईंपासून चांगले दुग्धोत्पादन बारामती येथील बाजारात संकरित गाईंच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ

बारामतीच्या बाजारातील चित्र : ४० ते ९० हजार रुपयांना संकरित गाईंची विक्रीबारामती : अनेक दिवसांपासून जनावरे बाजारातील मरगळ दूर होऊ लागली आहे. सोमवारपासून दुधाच्या खरेदीदरात २ रुपयांची वाढ झाल्याने बारामती येथील बाजारात गुरुवारी (दि. १९) जनावरांच्या किमतीमध्ये वाढ झाली. ४० ते ९० हजारांदरम्यान संकरित गाईंची खरेदी-विक्री झाली. तर, होस्टन फ्रिजीयन जातीच्या एका गाईची विक्री १ लाख १८ हजार रुपयांना झाली. आधी दुष्काळी स्थिती, त्यानंतर परतीच्या पावसाचा धुमाकूळ यामुळे चाऱ्याच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली होती. त्यातच दुधाचे दरदेखील पडल्याने जनावरे बाजारात मरगळ आली होती. मात्र हळूहळू ही परिस्थिती सुधारत चालली असून सोमवारी जनवारांचा बाजार वधारला.सोमवारपासून दुधाला ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ आणि २९.५० डिग्री असणाऱ्या दुधाला प्रतिलिटर २९ रुपये एवढा खरेदी दर दूध संस्थांकडून मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी बारामती येथील बाजारात संकरित गाईंच्या किमतीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली. ४० हजारांपासून पुढे गाईंचे दर होते. दुग्धव्यवसायासाठी संकरित गाईंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी विदेशी जातीच्या गाईंना शेतकऱ्यांची पसंती असते. तसेच, या गाईंपासून चांगले दुग्धोत्पादन शेतकऱ्यांना मिळते. बारामती तालुक्यासह इंदापूर, दौंड, फलटण, पुरंदर, अकलूज, माळशिरस, राशीन आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकरी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी बारामतीच्या बाजारात जनावरे दर आठवड्याला दाखल करतात. तसेच, बाजार समितीच्या वतीनेदेखील येथे विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर आठवड्याला गुरुवारी येथे परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते......दुधाचे दर वाढल्याने बाजारात गाईंची आवक आणि दरही चांगले राहिले आहेत. त्यातुलनेत म्हशी आणि बैलांची आवक होत नाही. दुग्धव्यवसायासाठी आवश्यक जातिवंत गाईंची आवक दर आठवड्याला बाजारात होत असते.- अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती......बारामती येथील बाजारात ४०० गाईंची आवक झाली होती. या गाईंना ४० ते ९० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यातुलनेत केवळ २५ म्हशी व १५ खिलारी बैलांची आवक झाली. म्हशींना ४० ते ७५ हजारापर्यंत दर मिळाला, तर बैलांना ३५ ते ५५ हजार रुपये इतका दर मिळाला. 

.............................सध्या ऊस हंगाम सुरू आहे; त्यामुळे कारखाना परिसरात येणाऱ्या ऊसतोडणी कामगारांकडून चांगल्या जातींवर खिलारी बैलांना मागणी असते. मात्र, सध्या कारखान्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने ‘मिनी ट्रॅलर’मधून ऊसवाहतूक वाढल्याने बैलांची आवक तसेच किमतीही मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत.

टॅग्स :Baramatiबारामतीcowगायmilkदूध