शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

.... असा रोखला बालविवाह ; चित्रपटाप्रमाणे घडली घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:52 IST

वधूचे वय केवळ दोन महिन्यांनी कमी असल्याने हा कायद्याने बालविवाह ठरला गेला असता. त्यामुळे पोलिसांनी वधू-वर पक्षाच्या जेष्ठांना समजावून सांगूनहा विवाह रोखला आणि त्याचवेळी दोन महिन्यांनी हा विवाह पुन्हा होण्याची घोषणा झाली.

राजगुरुनगर:  गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून वधु-वर कार्यालयात आले, वाजंत्री लावून साखरपुड्याची ताटे व्यासपीठावर आणली, दोन्हीकडच्या भरगच्च उपस्थितीत सुपारी फुटली, औक्षण झाले आणि मांडवातील पै-पाहुण्यांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. मात्र साखरपुडा संपल्यावर हळदी लागायच्या आधीच कार्यालयात पोलीस आले आणि लग्न थांबले.वधूचे वय केवळ दोन महिन्यांनी कमी असल्याने हा कायद्याने बालविवाह ठरला गेला असता. त्यामुळे पोलिसांनी वधू-वर पक्षाच्या जेष्ठांना समजावून सांगूनहा विवाह रोखला आणि त्याचवेळी दोन महिन्यांनी हा विवाह पुन्हा होण्याची घोषणा झाली. त्यामुळे लग्नासाठी आहेर-गिफ्ट घेऊन आलेले पाहुणे पुन्हा गिफ्ट घेऊन परतले. ही घटना आहे राजगुरुनगर परिसरातील.  बुधवारी (दि१२) नियोजित असलेल्या या विवाह समारंभात घडलेल्या या घटनेची तालुकाभर चर्चा रंगली. दोन्ही बाजूने संमतीने ठरलेला व उत्साही वातावरणात सुरु असलेला हा समारंभ एका कार्यालयात होणार होता. त्यासाठी पत्रिका छपाई करून नातेवाईक, स्नेहीजनाना वाटप करण्यात आले होते. साखरपुड्याला गर्दी झाली होती. लग्न सामारंभ सुध्दा तोलामोलाचा होणार होता. मात्र तसे घडले नाही.एका अज्ञात व्यक्तीने खेड पोलिसाना माहिती कळवली.त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेश नलावडे, संजय नाडेकर,निखील गिरीगोसावी, विशाल कोठावळे यांनी सबंधित कार्यालयात जाऊन खातरजमा करून हा बाल विवाह रोखला.याबाबत दोन्ही बाजूच्या जबाबदार व्यक्तींकडून माहिती घेतली असता. वैयक्तिक वादातून अज्ञात व्यक्तीने तक्रार केल्याने केवळ साखरपुडा उरकला. मुलीला १८ वर्षे पूर्ण व्हायला दोन महिने बाकी आहेत. त्यानंतर लंग समारंभ संपन्न केला जाईल असे सांगण्यात आले.मुलीच्या वडीलांचे निधनांने नातेवाईकांनी केली घाईमुलीच्या वडीलांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. आई आजारी असून कुटुंबात इतर कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने नातेवाईकानी हा विवाह करायचे ठरवले होते. मात्र तसे घडले नाही. समाजात मुलींबाबत घडणा-या विचित्र घटना विचारात घेऊन नातेवाईकानी हे पाउल उचलले होते. मात्र भावना,जबाबदारी यापेक्षा कायद्यापुढे कर्तव्य हतबल झाल्याची खंत मुलीच्या एका नातेवाईकाने व्यक्त केली.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीKhedखेड