अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार

By Admin | Updated: February 2, 2016 01:37 IST2016-02-02T01:37:04+5:302016-02-02T01:37:04+5:30

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरुवात होणार आहे.

To prevent the accident, he said | अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार

देहूरोड : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरुवात होणार आहे. देहूरोड ते निगडीदरम्यानच्या रस्त्याच्या संरक्षक बाजू पट्ट्या डांबरीकरण न करता अधिकाऱ्यामार्फत पाहणी करून अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली.
देहूरोडच्या शिष्टमंडळासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले, असे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले. देहूरोड ते निगडी दरम्यान गेल्या चौदा वर्षांत झालेल्या अपघातातील १५४ मृत्यू व १९३ जखमींची देहूरोड उपविभागीय पोलीस कार्यालय यांच्याकडून माहिती अधिकारात घेतलेली सविस्तर माहिती तसेच बाजू पट्ट्या काही ठिकाणी डांबरीकरण केल्या नसल्याचे रस्ते विकास महामंडळांचे उपाध्यक्ष मोपलवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मोपलवार यांनी देहूरोड ते निगडी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली असल्याने संबंधित रस्त्याच्या बाजूपट्ट्याच्या डांबरीकरण करण्यात येणार नाही. मात्र, अर्धवट कामाची चौकशी करण्यात येणार असून, अपघातांची संख्या अधिक असल्याने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तंतरपाळे यांनी सांगितले .

Web Title: To prevent the accident, he said