पोलीस असल्याचे भासवून चार तोळ्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:50+5:302021-04-01T04:11:50+5:30
अशोक सदाशिव जंगम (वय ७२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सहायक ...

पोलीस असल्याचे भासवून चार तोळ्याचे दागिने लंपास
अशोक सदाशिव जंगम (वय ७२, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जंगम हे ३० मार्च रोजी सकाळी ११ वा.च्या सुमारास वारूळवाडी गावच्या हद्दीतील टोमॅटो मार्केट-वारूळवाडी रोड वरून जात असताना ते चिकुचे बागेजवळ आले असता तिथे दोन इसमांनी येऊन जंगम यांना म्हणाले की, आम्ही सीबीआय पोलीस असून येथे तुकाराम शिंदे कोठे राहतो ,असे विचारून तो गांजा विक्री करत आहे, असे सांगून सध्या कोरोना चालू असुन तुम्ही हातात अंगठी व गळ्यात चैन घालू नका, असे सांगून एक-एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन मला अंगावर काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले आणि जंगम यांना बोलण्यामध्ये गुंतवून त्यांची सोन्याची चैन व दोन अंगठ्या फसवणूक करून घेऊन गेले.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नवघरे या करीत आहेत.
दरम्यान, पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना फसवून त्यांच्या गळ्यातील, हातातील सोन्याचा ऐवज लंपास करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र अद्याप एकाही घटनेचा तपास न लागल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी अशा ठकांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे यांनी केली आहे.