जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
By Admin | Updated: February 18, 2017 02:25 IST2017-02-18T02:25:06+5:302017-02-18T02:25:06+5:30
पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पेरणे-वाडेबोल्हाई या जिल्हा परिषद गटामधून अत्यंत चुरशीचा सामना रंगला

जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
लोेणीकंद : पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पेरणे-वाडेबोल्हाई या जिल्हा परिषद गटामधून अत्यंत चुरशीचा सामना रंगला असून, या लक्षवेधी निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा भाग पुणे शहरालगत असून, ग्रामीण भागाचा वळसा असलेला गट तयार झाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप कंद यांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या गटातून राष्ट्रवादीचे कंद यांचे खंदे समर्थक व माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांच्या पत्नी कल्पना यांना रिंगणात उतरवले आहे, तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या गडाला सुरूंग लावण्यासाठी सर्वपक्षीय आघाडी करण्यात आली असून;
शिवसेना, भाजपा, मनसे, रासप, आरपीआय हे पाच पक्ष एकत्र येऊन श्री शंभूराजे बोल्हाईमाता विकास महाआघाडी स्थापन करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान उभे केले आहे. एकास एक उमेदवार दिल्याने चुरस निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा लोचन शिवले, पेरणे येथील युवती काँग्रेसच्या गीतांजली वाळके यांनीही उमेदवारीची मागणी केली होती, पण पक्षाने उमेदवारी नाकारुन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पेरणे-वाडेबोल्हाई गटामधून कल्पनाताई सुभाष जगताप, तर पेरणे पंचायत समिती गणामधून संजीवनी उमेश कापरे, वाडेबोल्हाई गणातून राजेंद्र पंढरीनाथ पठारे यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीची सारी भिस्त जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केलेली मतदारसंघाची भक्कम बांधणी, जिल्हा परिषद माध्यमातून गटामध्ये ९८ कोटी १२ लाखांची विकासकामे, राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदारसंघ या जमेच्या बाजू आहेत.
श्री शंभूराजे बोल्हाईमाता विकास महाआघाडीकडून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भोंडवे यांच्या पत्नी जयर्श्री संदीप भोंडवे यांना गटातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर पेरणे गणामधून सुजाता नीलेश वाळके, वाडेबोल्हाई गणामधून शामराव परिलाल गावडे यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची नाराज मते ही प्रमुख भिस्त असून, संदीप भोंडवे यांनी कुस्तीस्पर्धा, बैलगाडा शर्यती आणि क्रिकेट कंद यांच्यासाठी दुसरी लढाई ...
या मतदारसंघाला वेगळी राजकीय किनार आहे. माजी आमदार अशोक पवार यांनी राजकीय वर्चस्वासाठी काँग्रेस आयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ वसंतराव कंद यांना पक्षप्रवेश देऊन पेरणे फाटा येथे सर्जिकल स्टाईलने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या घरातच (मतदारसंघ) शेतकरी मेळावा घेऊन ‘अॅटमबॉम्ब’ लावला, याचे पडसाद लोणीकंद ग्रामपंचायतीमध्ये उमटले.
प्रदीपदादा कंद यांनी ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद बहुमत मिळवून आव्हान परतवून लावले. आता ही दुसरी लढाई असून, उद्याची विधानसभा निवडणुकीची गणिते आखून प्रदीपदादा कंद आव्हान कसे परतावून लावतात आणि माजी आमदार अशोक पवार काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
सामने घेतले त्यांचा किती फायदा होतो हे निकालानंतरच कळेल, तसेच भोंडवे यांनी मागील तीन निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीत मला अपयश आले, तर परत निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा करून भावनिक आवाहन केले आहे. (वार्ताहर)
या गटामध्ये एकूण ३५,५४८ मतदार आहेत.
पुणे महापालिकेचा नियोजित पिंपरी सांडस येथील कचरा डेपो होऊ न देणे.
४यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करणे.बैलगाडा शर्यत सुरू करणे.
भामा-आसखेड धरणग्रस्त म्हणून शेतकऱ्यांच्या सातबारावरील शिक्के काढणे.२४ तास शेतीसाठी विद्युतपुरवठा.
प्रत्येक गावातील पिण्याचे पाणी, रस्ते आणि शाळा हे प्रश्न प्रामुख्याने प्रचारातील मुद्दे आहेत.