तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादींवर दबाव
By Admin | Updated: May 10, 2017 03:43 IST2017-05-10T03:43:41+5:302017-05-10T03:43:41+5:30
जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून दुबार विक्री प्रकरणात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर

तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादींवर दबाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून दुबार विक्री प्रकरणात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी असलेले मंडलाधिकारी व तलाठी यांनी स्थानिक वाळू ठेकेदार व नातेवाइकांना मध्यस्थी घालून तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केल्याने फिर्यादी यांची मानसिक व शारीरिक अवस्था बिघडली आहे.
जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरबदल करून विक्री केल्याप्रकरणी अनिल शंकर कुऱ्हाडे, पुष्पलता कुऱ्हाडे (दोघे रा. आळे) यांच्या सहमंडलाधिकारी दादाभाऊ काळे, तलाठी आर. सी. वामन यांच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात दि.३ रोजी गुन्हा दाखल करण्यात होता. या प्रकरणी राजेंद्र शंकर हांडे (वय ५७, रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
या प्रकारामुळे राजेंद्र हांडे यांची प्रकृती गेली ४ दिवसांपासून बिघडली आहे. त्यांच्यावर २००७ साली हृदय शस्त्रक्रिया झाली होती. जमीन फसवणुकीची घटना घडल्यापासून त्याची शारीरिक प्रकृती बिघडली आहे. त्यात हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी वारंवार दबाव येत असल्याने त्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन बिघडले आहे.
छातीत दुखू लागल्याने काल (दि. ८) त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. अजूनही हे प्रकरण मिटवून घ्या, असे दररोज फोन येत आहेत, यामुळे आम्ही पूर्णपणे त्रस्त झालो आहेत. पतीची तब्बेत यामुळे बिघडली आहे.