राष्ट्रपती मुखर्जी आज पुण्यात

By Admin | Updated: November 25, 2014 01:45 IST2014-11-25T01:45:27+5:302014-11-25T01:45:27+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दोन दिवसांच्या दौ:यासाठी मंगळवारी सायंकाळी पुण्यात आगमन होत आह़े

President Mukherjee today in Pune | राष्ट्रपती मुखर्जी आज पुण्यात

राष्ट्रपती मुखर्जी आज पुण्यात

>पुणो : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दोन दिवसांच्या दौ:यासाठी मंगळवारी सायंकाळी पुण्यात आगमन होत आह़े संध्याकाळी साडेसात वाजता बंगळुरू येथून खास विमानाने ते लोहगाव विमानतळावर येतील़ राज्यपाल सी़ विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील़ त्यानंतर त्यांचा राजभवन येथे मुक्काम राहणार आह़े 
26 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता ते सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अकराव्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 12़3क् वाजता लोहगाव विमानतळावरून ते नागपूरकडे प्रयाण करतील़ (प्रतिनिधी)

Web Title: President Mukherjee today in Pune