शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी कातलेल्या सुताच्या कापडातून बनणार राष्ट्रपती व पंतप्रधानांचे जॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 12:07 IST

विद्यार्थ्यांनी चरख्यावर सूतकताई करून तयार झालेल्या कापडापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्यासाठी जॅकेट तयार होणार आहे.

- राजानंद मोरेपुणे - विद्यार्थ्यांनी चरख्यावर सूतकताई करून तयार झालेल्या कापडापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्यासाठी जॅकेट तयार होणार आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही सूतकताई केली आहे. या सुतापासून वर्धा येथून पाच मीटर कापड तयार करून घेण्यात आले आहे. हे कापड उद्या दिल्लीला रवाना केले जाईल.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र तसेच राज्य शासन, विविध पक्ष संघटनांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. पण या विद्यार्थ्यानी चरख्यावर सूतकताई करून ख-या अर्थाने गांधीजींपासून प्रेरणा घेतल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शालेमध्ये मागील दीड वर्षांपासून कार्यशिक्षण या विषयांतर्गत चरख्यावर सूतकताई करणे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता, चिकाटी आणि स्वावलंबनाचे महत्त्वा कळावे हा यामागचा हेतू. या उपक्रमासाठी शाळेने वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून तीन अंबर चरखे आणले. त्यावर आधी माधव सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षकांना सूतकताईचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर शिक्षकानी विद्यार्थ्यांना शिकविले. शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या ३० विद्यार्थ्यांना या उपक्रमात घेण्यात आले. शिक्षक स्वाती जज्जल व भगवान जानकर हे या विभागाचे प्रमुख आहेत.सूतकताईसाठी लागणा-या कापसाच्या वातीही वर्धा येथून आणण्यात आल्या आहेत. सुरुवातीला दर आठवड्याला दोन तास आणि वर्षभरापासून दररोज एक तास असे सूतकताईचे काम सुरू होते. दोन मीटर कापड तयार होण्यासाठी सलग आठ ते दहा तास सूतकताई करावी लागते. विद्यार्थ्यांनी मागील दीड वर्ष शाळेचे वेळापत्रक सांभाळून केलेल्या सूतकताईतून तब्बल पाच मीटर कापड तयार झाले आहे. सेवाग्राम आश्रमातील वीणकरांनी हे कापड तयार केले आहे. त्यांच्याकडे महिनाभरापूर्वी सूत पाठविण्यात आले होते. पाच मीटर कापडापैकी अडीच मीटर कापड राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अडीच मीटर कापड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. या कापडापासून त्यांनी जॅकेट तयार करावे, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या काही दिवस आधीच हे कापड तयार झाले. तर जयंतीच्या पूर्वसंध्येला कापड विद्यार्थ्याकडे एका विशेष कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले. -------------------शाळेत सूत कताईचा उपक्रम सुरूच ठेवला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या सूतकताईमधून त्यांच्यासाठी शर्ट तयार करण्याचे नियोजन होते. मात्र त्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आता किमान हातरुमाल करण्याचा विचार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. ----------------अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामधील कापडाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, त्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. सूतकताई करताना अत्यंत लक्षपूर्वक करावे लागते. त्यातून एकाग्रता आणि चिकाटी वाढते. याचा विद्यार्थ्याना खुप फायदा झाला आहे.- नागेश मोने, मुख्याध्यापकन्यू इंग्लिश स्कूल

टॅग्स :Puneपुणे