जिल्ह्यात पावसाची हजेरी!
By Admin | Updated: July 7, 2014 22:47 IST2014-07-07T22:47:18+5:302014-07-07T22:47:18+5:30
आज दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर, भवानीनगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

जिल्ह्यात पावसाची हजेरी!
सोमेश्वरनगर : आज दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर, भवानीनगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, या पावसावर पेरण्या होणार नाहीत. त्यासाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यता आहे. मृग नक्षत्र
पूर्ण कोरडे गेल्याने जिरायती भागातील पेरण्या अजूनही खोळंबल्या
आहेत. हा पडणारा अवकाळी पाऊस तात्पुरता आहे.
इंदापूर : मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असणरा पाऊस अखेर सोमवारी (दि. 7) इंदापूर शहर, निमगाव केतकी परिसरात हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी पावणोसहा वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने वातावरणातील सारा उष्मा घालविला. तसेच शेतक:यांच्या आशा देखील पल्लवीत केल्या.
यवत : यवत व परिसरातील
कासुर्डी, खोर, चौफुला आदी गावांमधे आज (दि.7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने
हजेरी लावली . मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने चिंतित झालेल्या शेतकरी वर्गाला आजच्या पावसाने दिलासा मिळाला. तसेच, मागील दोन दिवसांपासून प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा आनंद घेता आला.
कवठे येमाई : महिनाभरापासून संपूर्ण राज्यात दडी मारलेल्या पावसाने अचानकपणो हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अचानक आलेल्या पावसाने खरीप पेरणीसाठी वाट पाहणारा शेतकरी आज काही अंशी सुखावला. फळबागांना जीवदान मिळाले आहे.