शहरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:46+5:302021-09-06T04:15:46+5:30
पुणे : शहर व परिसरात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा हा जोर रविवारी सकाळपर्यंत होता. त्यानंतर रविवारी ...

शहरात पावसाची हजेरी
पुणे : शहर व परिसरात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा हा जोर रविवारी सकाळपर्यंत होता. त्यानंतर रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती. पुढील काही दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवार सकाळपर्यंत पुणे शहरात १५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात आतापर्यंत शहरात ४्र३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरीच्या तुलनेत ८६.१ मिमीने कमी आहे. त्याचवेळी लोहगाव येथे गेल्या २४ तासात २५.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. लोहगाव येथे आतापर्यंत ४४३.१ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ५८.२ मिमीने अधिक आहे. त्याचवेळी पाषाण येथे १६ मिमी पाऊस झाला असून या हंगामात आतापर्यंत ४४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात पुढील तीन दिवस आकाश पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरुपाचा स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.