शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

प्रदूषण रोखण्याचा ‘आराखडा’ तयार!, रासायनिक सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करून वनविभागाला देण्याची तयारी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:09 AM

कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रदूषणाच्याबाबतीत जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कुरकुंभ येथील पाण्याच्यासंदर्भात घेण्यात आलेला अ‍ॅक्शन प्लॅन जवळपास तयार झाला असून यावर युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याची माहिती या संबंधित अधिकाºयांनी दिली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कुरकुंभ येथील रासायनिक प्रदूषणाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याची सांगत सांडपाण्याला पूर्ण प्रक्रिया न करता उघड्यावर सोडणाºया कंपन्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी अगदी अल्पावधीत या सर्व प्रकारांवर निर्णय देऊन कित्येक वर्षांपासून जाणूनबुजून खितपत पडलेल्या विषयाला निकाली काढल्याने कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी राव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून या सर्व घटनेचा लेखाजोखा मागितला आहे.याबाबत लवकर उपाययोजना करून माहिती मागितली आहे. त्यानुसार कुरकुंभ येथे जोमात काम सुरू असून येणाºया अगदी दोन दिवसांत या प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाऊन प्रक्रिया केलेले सांडपाणी वनविभागाला सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.गेली दहा वर्षांत वनविभागाच्या जागेत पाणी सोडण्याची यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे या आदेशानुसार यावर तत्काळ काम सुरू करण्यात आले असून याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे येणाºया काही दिवसांतच याचे काम पूर्ण करून पाण्याची विल्हेवाट लागणार आहे. महाराष्ट्र विकास मंडळाच्या अधिकाºयांनीदेखील याबाबत दुजोरा दिला असल्याने आता लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होताना दिसणार असल्याची चिन्हे आहेत.>कुरकुंभ येथील जनतेने प्रथमच जनआक्रोश आंदोलन करीत या सर्व जबाबदार प्रशासनाला जाब विचारला होता. ग्रामस्थांच्या या लढ्याचे प्रथमच पडसाद उमटून सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.याचाच परिणाम म्हणूनच या लढ्याला यश प्राप्त झाले व शासनदरबारी याची योग्य दखल घेतली गेली. परिणामी मोठ्या स्वरूपात कुरकुंभ येथील रासायनिक पाण्याचे प्रदूषण थांबले आहे.>उग्र वासातून मुक्तीकुरकुंभ येथील ओढ्यातून मोठ्या स्वरुपात वाहत येणारे रासायनिक सांडपाणी अगदी कुरकुंभच्या मुख्य चौकात बारामतीकडे जाणाºया मार्गावरील पुलाखाली जमा होत होते. परिणामी या सर्व ठिकाणी उग्र वास व दुर्गंधी पसरली होती. या ओढ्याच्या कडेलाच दर गुरुवारी आठवडेबाजार भरत असल्याने हजारो नागरिक या दुर्गंधीने त्रस्त होते. तसेच यालाच लागून प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने त्यालादेखील याचा दुष्परिणाम भोगावा लागत होता. मात्र सामूहिक सांडपाणी प्रक्रिया बंद असल्याने तो उग्र वास जवळपास बंद झाला असून नागरिकांनी व या ओढ्याने दोन दशकातून पहिल्यांदा या प्रदूषणातून मुक्ती मिळवली असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.>कंपन्यांची झाडाझडतीजिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी प्रथमच मोठ्या स्वरुपात याची गंभीर दखल घेऊन सर्व कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. विविध अधिकारी या ठिकाणी येऊन कंपन्यांची पाण्याबाबत माहिती गोळा करीत आहेत.अशा प्रकारची मोठी कारवाई प्रथमच या ठिकाणी होत असल्याचे काही कंपन्यांच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. त्यामुळे अगदी थोड्या काळातच सदोष कंपन्या समोर येणार असून या सर्वांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

टॅग्स :Puneपुणे