महाराष्ट्रातील मल्ल तयारीचे
By Admin | Updated: April 29, 2017 04:18 IST2017-04-29T04:18:39+5:302017-04-29T04:18:39+5:30
महाराष्ट्रातील मल्लसुद्धा चांगल्या तयारीचे असतात. मातीवर खेळणे आणि गादीवर खेळणे यात फरक असतो. स्पर्धा म्हटले, की विजय आणि पराभव हे दोन्ही आलेच.

महाराष्ट्रातील मल्ल तयारीचे
शिवाजी गोरे / पुणे
महाराष्ट्रातील मल्लसुद्धा चांगल्या तयारीचे असतात. मातीवर खेळणे आणि गादीवर खेळणे यात फरक असतो. स्पर्धा म्हटले, की विजय आणि पराभव हे दोन्ही आलेच. त्यामुळे सर्वांनाच किताब जिंकण्याची जिद्द आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्ताने आयोजिलेल्या ५० व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी सुमितकुमार पुण्यात आला आला आहे. शहीद दिवस केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेतेपदासह ५० लाख रुपये रोख पारितोषिक जिंकलेला सुमितकुमार या स्पर्धेतील दमदार स्पर्धक आहे. मात्र, तरीही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, ‘‘सर्वच मल्ल विजेतेपद जिंकण्याच्या तयारीने आले आहेत. या स्पर्धेसाठी देशातील प्रत्येक मल्ल स्पर्धेच्या काही महिने आधीपासून तयारी करीत असतो. माझा भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरातही सराव होतो. नुकताच मी बल्गेरिया येथे भारतीय संघाबरोबर सरावासाठी गेलो होतो.
सुमितकुमार म्हणाला, ‘‘दहा वर्षांपूर्वी मी कुस्तीला सुरुवात केली. छत्रसाल स्टेडियममध्ये गुरू सत्पाल आणि सुशीलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आमचे गुरू व प्रशिक्षक आमच्याकडून कसून सराव करून घेत आहेत.’’