शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘त्या’ अर्भकाचे पालकत्व घेण्याची अनेकांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 23:57 IST

‘फेकून दिलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांच्या मायेची ऊब’ हे वृत्त शनिवारी (दि. १५) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले.

बारामती : तालुक्यातील माळेगाव कॉलनी येथे वडापावच्या गाड्यावर बेवारस अवस्थेत सोडुन दिलेल्या अर्भकाच्या संगोपनाची तयारी बारामती शहरातील अनेकांनी दर्शविली आहे. जन्मदात्यांनी सोडून दिलेल्या अर्भकाचे पालकत्व, मातृत्व स्वीकारून कुशीत घेण्यासाठी महिलांचे हात पुढे आले आहेत.

‘फेकून दिलेल्या नवजात अर्भकाला पोलिसांच्या मायेची ऊब’ हे वृत्त शनिवारी (दि. १५) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त वाचल्यानंतर शहरातील नागरिक हळहळले. अनेक दांपत्यांनी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्याशी संपर्क साधून त्या अर्भकाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच अनेकांनी नवजात अर्भक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावर पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी बाळाला दत्तक देण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडे नाही. बाळाला दत्तक घेण्यासाठी ‘चाईल्ड वेल्फेअर कमिटी’कडे संपर्क साधावा, असे सूचित केले. तसेच शहरातील एका नामांकित कापड दुकानात काम करणाऱ्या निपुत्रिक महिलेनेदेखील ‘आम्हाला मूलबाळ नाही, त्या बाळाला दत्तक घेऊन आई-वडीलांच्या मायेची ऊब देण्याची तयारी दर्शविल्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले.शहर पोलिसांनी हुडहुडी भरविणाºया थंडीत वडापावच्या गाड्यावर नवजात अर्भकाला सोडून देणाºया अज्ञात मातापित्यांचा शोध सुरू केला आहे. त्या अर्भकाच्या अंगावरील मलमल कापड, लोकरीचा स्वेटर, कानटोपी, ‘लव्ह’ लिहिलेले लोकरसदृश कापड आदींचे छायाचित्र काढले आहे. त्याद्वारे हे कपडे खरेदी केलेल्या कापड दुकानासह, दुकानातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून त्या मातापित्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी बारामतीसह आसपासच्या भागात शनिवारपासून शोधमोहीम सुरू केल्याचेदेखील धुमाळ यांनी सांगितले.पोलीस अधीक्षकांचे बारामती पोलिसांना ५ हजारांचे बक्षीसनवजात अर्भकाला सापडल्यापासून त्याला केडगाव (ता. दौंड) येथील शिशु संगोपन केंद्रात पोहोच करेपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोसले, महिला पोलीस रेखा सोनवणे आदींनी कर्तव्यनिष्ठेपलीकडे जाऊन भूमिका बजावली. पोलिसांनी दिलेल्या मायेमुळे नवजात अर्भकाला नवीन जीवन मिळाले. त्याची माहिती समजताच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या पोलिसांचे कौतुक करीत ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.नवजात अर्भक सापडल्यानंतर तत्परता दाखवून त्याला मायेची ऊब देऊन जीवदान देणाºया बारामती पोलिसांवर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव सुरूच आहे.वडापावच्या गाड्यावर उघड्यावर फेकून दिलेल्या बाळापर्यंत पोलिसांच्या अगोदर परिसरातील भटकी कुत्री पोहोचली असती तर, या कल्पनेनेच अनेकांच्या अंगावर शहारे आले.पोलिसांना माहिती देणारे नगरसेविका रुपाली गायकवाड यांचे पती दीपक हे पोलीस येईपर्यंत थांबून होते. जन्मदात्यांनी फे कून दिले तरी अनोळखी, रक्ताचे नाते नसणाºयांनीच या अर्भकाला जीवदान दिले. त्यामुळे पोलिसांसह यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºयांवर कौतुकाचा वर्षाव सुरूच होता. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती