शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाची तयारी पूर्ण; शहरात ३ जानेवारीपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 20:56 IST

केंद्र सरकारच्या निर्देषानुसार पुणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी शहरात ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे

पुणे: केंद्र सरकारच्या निर्देषानुसार पुणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी शहरात ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याकरिता ५ स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून, या वयोगटातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नावनोंदणी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.     १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. केंद्राच्या सूचनेनुसार या लाभार्थी वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. महापालिकेने याकरिता कोव्हॅक्सिन लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे. शहरातील सर्व भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. 

सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्राच्या कोविन पोर्टल अथवा एप्लिकेशनचा वापर नावनोंदणी करण्यासाठी करता येणार आहे. या वयोगटासाठी ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली असून, लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक राहणार आहे.  लसीकरणासाठी ही केंद्र उपलब्ध 

१) कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर२) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ३) कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड४) भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा५) कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

शहरात दोन लाख लाभार्थी 

महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी पात्र मुलांची संख्या २ लाख २ हजार १०८ इतकी आहे. केंद्राच्या निर्देषानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४.८ टक्के संख्या या लसीकरणासाठी पात्र धरण्यात आली आहे. तर शहरात शिक्षणासाठी असलेले अथवा ये-जा करणाऱ्यांची ५० ते १ लाखापर्यंतची संख्या अधिकची गृहित धरण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे ५० हजारहून अधिक डोस शिल्लक असून, केंद्र शासनाकडूनही १ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक कोव्हॅक्सिन लसीचा अधिकचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे या वयोगटातील सर्वांना लस मिळेल अशी व्यवस्था महापालिकेने केली आहे.  

टॅग्स :Mayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPuneपुणे