गप्पाटप्पांनी रंगला ‘फुगे’चा प्रीमिअर

By Admin | Updated: February 22, 2017 02:44 IST2017-02-22T02:44:32+5:302017-02-22T02:44:32+5:30

स्वप्नील यांच्या संवादातील मिश्कीलपणा, नकळत का होईना पण सुबोध यांच्यामधील जाणवणारा पुणेरीपणा आणि या

The premiere of 'bubbles' with a lively chat | गप्पाटप्पांनी रंगला ‘फुगे’चा प्रीमिअर

गप्पाटप्पांनी रंगला ‘फुगे’चा प्रीमिअर

पिंपरी : स्वप्नील यांच्या संवादातील मिश्कीलपणा, नकळत का होईना पण सुबोध यांच्यामधील जाणवणारा पुणेरीपणा आणि या आपल्या लाडक्या अभिनेत्यांशी संवाद साधण्यासाठी आतुर झालेल्या व खास गुलाबी ड्रेस परिधान केलेल्या सखींच्या मेळ््यामुळे ‘फुगे प्रेमाची बॅकस्टोरी’ या चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ लक्षवेधी ठरला.
फेबु्रवारीतील गुलाबी आठवडा सखींसाठीही अविस्मरणीय ठरावा यासाठी सखी मंचातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय, सखींना खास (व्हेलेंटाईन) प्रेमदिनाची विशेष भेट देण्यासाठी लोेकमत सीनएक्स व सखी मंच यांच्यावतीने व स्पॉट १८ डिग्री रुफ टफ यांच्या सहकार्याने ‘फुगे प्रेमाची बॅकस्टोरी’ या चित्रपटाचा प्रिमियर शो चे आयोजन करण्यात आले.
हा प्रिमियर शो शनिवारी (दि. ११) दुपारी ३.१५ वाजता पिंपळे सौदागर येथील सिटी प्राईड,
रॉयल सिनेमातील तिसरया मजल्यावर पार पडला. या वेळी फुगे या चित्रपटातील अभिनेते स्वप्नील जोशी, सुबोध भावे आदी उपस्थित होते. यासह कन्याज ब्युटी  पार्लरच्या विद्या खोत, डॉ. गोकुळे हॉस्पिटलचे डॉ. विजय गोकुळे,  सॅम्स पिझ्जाचे वैशाली पवार, डॉ. नितीन गाडे, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट सुगंधा जोहर यांनीही हजेरी लावली होती. धावपळीच्या दिनक्रमातून संवादाच्या माध्यमातून विरंगुळा मिळाल्याची भावना सखींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: The premiere of 'bubbles' with a lively chat