पूर्ववैमनस्यातुन भोसरीत तरूणाचा खून

By Admin | Updated: October 29, 2016 21:22 IST2016-10-29T21:22:26+5:302016-10-29T21:22:26+5:30

र्ववैमनस्यातुन भोसरी, गव्हाणेवस्ती येथे विकास लक्ष्मण माळी (वय २०,रा.पांडवनगर,चक्रपाणीवसाहत भोसरी) या तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी ६ च्या सुमारास धारदार शस्त्रांचे वार केले.

Premarital Bloodshed Blood | पूर्ववैमनस्यातुन भोसरीत तरूणाचा खून

पूर्ववैमनस्यातुन भोसरीत तरूणाचा खून

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. २९ -  पुर्ववैमनस्यातुन भोसरी, गव्हाणेवस्ती येथे विकास लक्ष्मण माळी (वय २०,रा.पांडवनगर,चक्रपाणीवसाहत भोसरी) या तरूणावर अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी ६ च्या सुमारास धारदार शस्त्रांचे वार केले. गंभीर जखमी झालेल्या या तरूणाला रूग्णालयात नेले मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरी गव्हाणेवस्ती परिसरात हातात, कु-हाड, कोयता आणि तलवार घेतलेले सहा जणांचे टोळके सायंकाळी सहाच्या सुमारास आले. या टोळक्याने विकास माळी याच्यावर हल्ला केला. कुºहाड,कोयता, तलवारीचे सपासप वार केल्याने जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या गंभीर जखमी अवस्थेतील विकासला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात हलविण्यात आले. 
उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. विकास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भोसरीतील एका खुनाच्या गुन्हयात तो आरोपी होता. पुर्ववैमनस्यातुन त्याचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यकत केला आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना,भोसरीत घडलेल्या या खुनाच्या घटनेने शहरात खबबळ उडाली आहे.                         
 

Web Title: Premarital Bloodshed Blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.