गर्भलिंगनिदान टोळी पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय

By Admin | Updated: March 12, 2017 03:17 IST2017-03-12T03:17:08+5:302017-03-12T03:17:08+5:30

बिरोबावाडी (ता. दौंड) येथे गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीला १४ मार्चपर्यंत न्यायाालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. मधुकर शिंदे याने पश्चिम महाराष्ट्रात गर्भलिंग

The pregnancy diagnostic gang is active in West Maharashtra | गर्भलिंगनिदान टोळी पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय

गर्भलिंगनिदान टोळी पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय

पाटस : बिरोबावाडी (ता. दौंड) येथे गर्भलिंगनिदान करणाऱ्या टोळीला १४ मार्चपर्यंत न्यायाालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. मधुकर शिंदे याने पश्चिम महाराष्ट्रात गर्भलिंग चाचण्या केले असल्याचे समजते. दौंड तालुक्यात गर्भलिंगाच्या संदर्भात घडलेल्या घटनेबाबत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपी डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (रा. फलटण) याला ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान करायचे त्या तालुक्यातील ग्रामीण भागात स्थानिक युवकांना हेरून त्यांना पैशांचे आमिष दाखवून गर्भलिंगचाचणीच्या कृत्यात डॉ. मधुकर शिंदे सहभागी करून घेत होता. त्यानुसार रावणगाव (ता. दौंड) येथील हेमंत बबन आटोळे हा तालुक्यातून आणि परिसरातून डॉ. शिंदे याला गर्भलिंग चाचणीसाठी महिला पेशंट आणून देत होता. तर सोमनाथ होले (रा. बिरोबावाडी ता. दौंड) याच्या घराची खोली गर्भलिंग चाचणीसाठी वापरणार होते; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी छापा मारला. डॉ. शिंदे याने इंदापूर, बारामती, फलटण या परिसरात गर्भलिंग चाचण्या केले असल्याचे समजते.

तीन महिला शिरूरच्या
दौंड तालुक्यातील बेटवाडी येथे गर्भलिंग चाचणीसाठी आलेल्या तिन्ही महिला शिरूरच्या असून पोलिसांनी त्यांना या प्रकरणात साक्षीदार केले आहे. दरम्यान या महिलांच्या साक्षीवरून गर्भलिंग चाचणीतील रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

दीड वर्षापासून
डॉ. शिंदे कामावर नाही
डॉ. मधुकर शिंदे हा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम पाहात होता.
मात्र गेल्या दीड वर्षांपासून तो कामावर नाही, अशी माहिती दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपाली पाखरे यांनी सांगितले.

Web Title: The pregnancy diagnostic gang is active in West Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.