पेन्शन आॅनलाइन घेण्यास पसंती
By Admin | Updated: November 14, 2016 06:50 IST2016-11-14T06:50:19+5:302016-11-14T06:50:19+5:30
समाजप्रबोधन व जनजागृतीच्या चळवळीत वृद्ध कलावंत मोलाची भूमिका बजावतात. वृद्ध कलाकारांना मदतीचा हात देता यावा, यासाठी शासनाने सुरु केलेल्या आॅनलाइन

पेन्शन आॅनलाइन घेण्यास पसंती
प्रज्ञा केळकर-सिंग / पुणे
समाजप्रबोधन व जनजागृतीच्या चळवळीत वृद्ध कलावंत मोलाची भूमिका बजावतात. वृद्ध कलाकारांना मदतीचा हात देता यावा, यासाठी शासनाने सुरु केलेल्या आॅनलाइन पेन्शन सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील ११५० पैकी ११२८ कलावंत या योजनेचा लाभ घेत आहेत. आॅनलाइन पेन्शनचा लाभ घेणाऱ्या वृद्ध कलावंतांची संख्या ९० टक्क्यांवर पोचली आहे.
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांमधील वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यामध्ये आॅनलाइन पेन्शन जमा होत आहे. यापूर्वी, सांस्कृतिक संचालनालयाकडून जिल्हा परिषदेला पेन्शनसाठी निधी देण्यात येत असे, तो पंचायत समितीमार्फत वृद्ध कलावंतांना दिला जाता असे. पण ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असल्याने पेन्शन आॅनलाइन देण्यास सुरुवात करण्यात आली.
सध्या सुमारे पाच हजार वृद्ध कलावंत या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक अमिता तळेकर-धुमाळ यांनी दिली.