पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: January 17, 2015 00:15 IST2015-01-17T00:15:29+5:302015-01-17T00:15:29+5:30
पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. भोसरी पोलिसांनी अद्यापपर्यंत तिघांना अटक केली असून, या घटनेमुळे भोसरी परिसरात घबराट पसरली आहे.
अक्षय बाळासाहेब देशमुख (वय १९), श्रावण बाळासाहेब देशमुख (२४), रोहन सावकार पोखरकर (वय १८) यांना अटक केली आहे. तर सरदार यासीन अहमद, पवन, अक्षय सरवदे, संतोष कुंभार (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, ते फरार आहेत. याप्रकरणी आकाश सुखदेव थोरात (वय १८, रा. धावडे वस्ती, भोसरी) याने फिर्याद दिली आहे.
आकाश थोरात व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी गुरुवारी रात्री पावणेआठला धावडे वस्तीतील गल्ली क्रमांक दोन येथे आरोपींनी थोरात याच्यावर लोखंडी रॉड व दांडक्यांनी हल्ला केला. यानंतर थोरात व त्याच्या साथीदारांनी रात्री आठ वाजता अक्षय देशमुखच्या घरात घुसले. त्याचा भाऊ श्रावण व आईला बाहेर काढले. त्यानंतर दोघा भावांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत तलवार व कोयत्याने वार केले. (प्रतिनिधी)