हिंदी व मराठी गीतांचा अनमोल नजराणा
By Admin | Updated: February 17, 2017 05:10 IST2017-02-17T05:10:56+5:302017-02-17T05:10:56+5:30
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गीतांना उजाळा देण्यासाठी ‘गोल्डन इरा आॅफ लता अँड

हिंदी व मराठी गीतांचा अनमोल नजराणा
पुणे : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अजरामर केलेल्या गीतांना उजाळा देण्यासाठी ‘गोल्डन इरा आॅफ लता अँड आशा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ‘लोकमत’ वाचक आणि सखी मंच सभासदांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक लोकमत समूह आहे.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर अनेक दशके अधिराज्य गाजविलेल्या दोन सुप्रसिद्ध पार्श्वगायिका म्हणजेच लता मंगेशकर आणि आशा भोसले. या दोन्ही गायिकांनी आजवर अनेक गाणी गायली जी आजच्या काळातही रसिकांच्या मनात घर करून आहेत. भक्तिसंगीत, भावसंगीत, सुगम संगीत, युगुल गीत अशी अनेक गीते या गायिकांनी गायली आहेत.
कृष्णधवल काळापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत वेगवेगळ्या संगीतकारांनी साज चढविलेली अनेक गाणी या कार्यक्रमात रसिकांना ऐकण्याची संधी मिळेल.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली गीते ‘गोल्डन इरा आॅफ लता अँड आशा’ या कार्यक्रमाद्वारे सादर होणार आहेत.
या सुप्रसिद्ध गायिकांची गाणी पुण्यातील आघाडीच्या गायिका राधिका अत्रे आणि कोमल कनाकिया सादर करणार आहेत. बहिणाबाई चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमात अजय राव, संदीप आगवेकर आणि गफार मोमीन हे कलाकार साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन मिहिर भडकमकर करणार असून, कार्यक्रमाचे निवेदन सिद्धार्थ बेंद्रे करतील.
(प्रतिनिधी)