पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By Admin | Updated: January 20, 2015 00:44 IST2015-01-20T00:44:03+5:302015-01-20T00:44:03+5:30

लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

Pre-Pune water supply shut on Thursday | पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पूर्व पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर जलकेंद्रांतर्गत असलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी (दि. २१ ) रात्री १२ ते गुरुवारी (दि. २२) रात्री १२ वाजेपर्यंत लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिरा हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
पाणी बंद असलेला भाग
संपूर्ण हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, सय्यदनगर, सातववाडी, सोलापूर रस्ता, वानवडी, नेताजीनगर, आझादनगर, केदारीनगर, कोंढवा खुर्द गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, लुल्लानगर, साईबाबा नगर, एनआयबीएम परिसर, साळुंखे विहार रस्ता, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेबराटे नगर, चिंतामणीनगर, सय्यदनगर, आकाशवाणी, पंधरा नंबर, माळवाडी, मगरपटटा, मुंढवा, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, भीमनगर, घोरपडी, कॅम्प, लष्कर परिसर, बी. टी. कवडे रस्ता, सॅलिसबरी पार्क, संपूर्ण येरवडा परिसर, कल्याणीनगर, आळंदी रस्ता, मोहनवाडी, प्रतीकनगर, जेल रस्ता, शांतीनगर, भारतनगर, संगमवाडी, साप्रसगाव, वडगावशेरी, नागपूरचाळ, हौसिंग बोर्ड, ताडीवाला रस्ता, कोरेगावपार्क, पाटील इस्टेट, मुळारस्ता, जुना-पुणे मुंबई रस्ता, अभियांत्रिकी महाविद्यालय, मालधक्का परिसर, मंगळवारपेठ, कामगार पुतळा, शिवाजीनगर, खराडी, वडगावशेरी, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी. (प्रतिनिधी)

Web Title: Pre-Pune water supply shut on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.