प्री-पेड वीज मीटरला ग्राहकांचा ठेंगा !
By Admin | Updated: December 16, 2014 04:29 IST2014-12-16T04:29:18+5:302014-12-16T04:29:18+5:30
महावितरणच्या वतीने तीन वर्षांपुर्वी प्रायोगिक तत्वावर प्री-पेड वीज मीटर योजना सुरू केली होती. परंतु, या मीटरला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही

प्री-पेड वीज मीटरला ग्राहकांचा ठेंगा !
पुणे : महावितरणच्या वतीने तीन वर्षांपुर्वी प्रायोगिक तत्वावर प्री-पेड वीज मीटर योजना सुरू केली होती. परंतु, या मीटरला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या योजनेला गती मिळालेली नाही.
प्री-पेड वीज मीटरचा पहिला प्रयोग पुणे, नागपूर, औरंगाबाद, पेण, कल्याण, कोल्हापुर, महाबळेश्वर, माथेरान, चिखलठाणा या ठिकाणी राबविला. त्यामध्ये सुमारे २५ हजार मीटर बसविण्यात आले होते. हे मीटर महावितरणतर्फे मोफत बसवून देण्यात आले. त्यासाठी कसलेही सुरक्षा ठेव ग्राहकांकडून घेण्यात आले नव्हते. मोबाईलचे कार्ड जसे प्री-पेड असते. त्याप्रमाणे हे वीज मीटरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामध्ये ग्राहकांना आगाऊ पैसे भरून हे कार्ड घ्यावे लागते. त्यामुळे ५ टक्के बिलात सवलत देण्यात आलेली होती. तसेच ग्राहकांची वीज बचतही होणार होती. कार्डमधील पैसे संपले की आपोआप वीज पुरवठा बंद होतो. सुरूवातीला या उपक्रमाचा मोठा गाजावाजा झाला. महाबळेश्वर व लोणावळा परिसरात हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्या ठिकाणी सेकंड होम मध्ये प्री-पेड मीटर बसविण्यात आले होते.
(प्रतिनिधी)