शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 15:59 IST

प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ठळक मुद्दे हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा

पुणे :अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक यादिवशी आपण देवघरांत सोने,चांदी ,हिरे यांचे पूजन करण्यात येते. ते अक्षय रहावे म्हणून प्रार्थना केली जाते. त्यापेक्षाही महत्वाचे आणि अनमोल जर काही आपल्या जीवनात असेल तर ते आहे पाणी. हे पाणी प्रदूषण मुक्त, जिवंत आणि अक्षय रहावे म्हणून भरल्या घटाचे पूजन आणि प्रार्थना या अक्षयतृतीयेच्या निमित्त पर्यावरणप्रेमी करणार आहे.पर्यावरणप्रेमींनी अक्षयतृतीया निमित्त पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. या मुहूर्तावर पाण्याने भरलेले घट दान करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त आपण जल समृद्ध देश घडवण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करू हे जल दान निश्चित अक्षय राहील.    तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते.उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, पादत्राणे अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.परंतु, पर्यावरण प्रेमींचा हा उपक्रम इतरांनीही करावा असा आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी गणेश कलापुरे म्हणाले, पाणी हे जीवन असून ते अक्षय राहिले तरच आपण जिवंत राहू. पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. दरवर्षी मंदिरात जाऊन पाण्याचा घट दान करतो. त्याचे पूजन करतो. मी हा उपक्रम घरी राबवतो. कारण पाणी हे अक्षय रहावे, हा त्यामागील हेतू आहे. प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी देखील हा उपक्रम राबवावा. त्यांचा हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा ठरणारा आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी