नमाजसोबत पावसासाठीही प्रार्थना
By Admin | Updated: September 27, 2015 01:23 IST2015-09-27T01:23:45+5:302015-09-27T01:23:45+5:30
येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. या वेळी जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. तसेच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नमाजसोबत पावसासाठीही प्रार्थना
वडापुरी : येथे बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. या वेळी जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण केले. तसेच एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी मौलाना हफिज सय्यद शेख यांनी नमाज पठण केले. या वेळी दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, पाऊस पडू दे, सर्वांना सुख, समृद्धी दे अशी प्रार्थना केली.
या वेळी वडापुरीसह सुरवड, भांडगाव, काटी, पंधारवाडी, अवसरी येथील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जामा मस्जिदमध्ये नमाज पठण केले. या वेळी मौलाना शेख यांनी बकरी ईदचे महत्त्व सांगितले.
ईद निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांना शुभेच्छा दिल्या.