प्रवीण निकम आशिया खंड अध्यक्षपदी
By Admin | Updated: March 12, 2016 00:39 IST2016-03-12T00:39:09+5:302016-03-12T00:39:09+5:30
राष्ट्रकुल युवा परिषदेच्या आशिया खंडाच्या अध्यक्षपदी प्रवीण निकम यांची युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सन २०१६ - २०१८साठी झालेल्या निवडणुकीत निकम

प्रवीण निकम आशिया खंड अध्यक्षपदी
पिंपरी : राष्ट्रकुल युवा परिषदेच्या आशिया खंडाच्या अध्यक्षपदी प्रवीण निकम यांची युवा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या सन २०१६ - २०१८साठी झालेल्या निवडणुकीत निकम भारतातर्फे अधिकृत उमेदवार होते. दि. १२ ते २२ मार्चदरम्यान लंडन (इंग्लंड) येथे होणाऱ्या कार्यक्रमात ब्रिटनच्या राणी यांच्या उपस्थितीत पदभार समारंभ होणार आहे.
शिक्षणासाठी वंचित असलेल्या मुलांसाठी आणि अंध विद्यार्थ्यांना मोफत लेखनिक उपलब्ध करणे, तसेच त्यांच्याकरिता पुस्तके ब्रेलमध्ये रूपांतरित करून देणे, त्याचबरोबर महिलांसाठी आरोग्य व मासिक पाळी याबाबत शिबिर घेऊन सुमारे १००००पेक्षा अधिक महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम निकम यांनी केले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कामाची दखल घेत भारत सरकारने सन २०१४-२०१५ यासाठीचा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. (प्रतिनिधी)