शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'नवाब मलिक हे काय साधू, संत किंवा अहिंसेचे पुजारी नाहीयेत...'; दरेकरांची मलिकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 18:19 IST

भाजप नेते प्रविण दरेकरांचे पुण्यात वक्तव्य...

पुणे :नवाब मलिक (nawab malik) जणू काही साधू, संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते, असं भाजप नेते प्रविण दरेकर (pravin darekar) पुण्यात म्हणाले. सध्या भाजपवर सातत्याने आरोप केला जातो की भाजपा यंत्रणांचा गैरवापर करते. अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावरील कारवाईची मागणी भाजपने केली नाही, असंही दरेकर म्हणाले.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले. शिवसेनेच्या संजय राठोड (sanjay rathod) यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली. हा सत्तेचा गैरवापर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले. तर दुसरीकडे नाना पटोले (nana patole) यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला, तरी कारवाई नाही. सध्या राज्य सरकार सूड भावनेने राजकारण करत आहे, असंही दरेकर म्हणाले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, आता ठाकरी बाणा कुठे गेला त्यांना पटत असेल, पण बोलणार कसे? असं प्रविण दरेकर म्हणाले. 'राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर सत्तेचे काय होणार, त्यामुळे मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. नवाब मलिक देशभक्त असल्याप्रमाणे आव आणला जात आहे.', असंही दरेकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेpravin darekarप्रवीण दरेकरchandrakant patilचंद्रकांत पाटीलnawab malikनवाब मलिक