प्रांजली निफाडकर- आवटे यांचे अपघाती निधन
By Admin | Updated: September 9, 2015 01:14 IST2015-09-09T01:14:27+5:302015-09-09T01:14:27+5:30
येथील उदयोन्मुख कथ्थक नर्तिका प्रांजली निफाडकर-आवटे (२७) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रदीप निफाडकर यांच्या त्या कन्या होत्या.

प्रांजली निफाडकर- आवटे यांचे अपघाती निधन
पुणे : येथील उदयोन्मुख कथ्थक नर्तिका प्रांजली निफाडकर-आवटे (२७) यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रदीप निफाडकर यांच्या त्या कन्या होत्या.
कथ्थकच्या कार्यक्रमाच्या सरावासाठी सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या दुचाकीवरून जात होत्या. समोरुन जात असलेली दुचाकी अचानक वळल्याने तिला धडकून त्या खाली पडल्या. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पती सुशांत आवटे, दीड वर्षांचा मुलगा, आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. बुधवारी सकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (प्रतिनिधी)