शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:29 IST

पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर पार्टीत ट्रॅप लावला आणि ताब्यात घेतले. पिशवीत २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? असे अनेक प्रश्न खेवलकर यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले.दरम्यान, पती खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे या वकिलाचा कोट घालून न्यायालयात आल्या होत्या. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने खळबळ उडाली. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह ७ जणांना अटक केली. अटकेत असलेल्या सात आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की मागील वेळेचा अगदी बरोबर तोच रिमांड रिपोर्ट दिला आहे. रिमांड रिपोर्टमध्ये काय जप्त करायचे आहे, याचा उल्लेख नाही.अमली पदार्थ कोणाच्या बॅगमधून आले? तर ईशा सिंग यांच्या बॅगमधून आले. जे व्हिडिओ व्हायरल केले त्यात सुद्धा दिसत आहे की तिच्या बॅगमधून अमली पदार्थ आहेत. राजकीय व्यक्तीच्या जवळचा माणूस असल्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी मिळावी असे म्हणत आहेत. पण प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी ठोंबरे यांनी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, "पहिल्या दिवसापासून पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी सीडीआर सुद्धा मिळवला आहे. त्यात राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे. त्याचा नेमका या पार्टी मधील काय सहभाग आहे, हे अजून तपासायचे आहे. तर तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. राहुल नावाचा व्यक्ती निष्पन्न झाला आहे, तो हुक्का भरत होता. अमली पदार्थ कुठून आणले तर आरोपी एकमेकांचे नाव घेत आहेत.एप्रिल व मे महिन्यातही झाली होती हाऊस पार्टी खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील अमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यात देखील हाऊस पार्टी झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून अनेक महिलांशी चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडिओ मिळाले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड