शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

Pranav Marathe चा जामीन अर्ज फेटाळला; Cosmos Bank चं थकवले साठ कोटींचं कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 21:37 IST

तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

ठळक मुद्देआरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केली नाही

पुणे : ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १८ गुंतवणूकदारांची ५ कोटी नऊ लाख ७२ हजार ९७० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात प्रणव मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

या गुन्ह्यात मराठे ज्वलर्स-प्रणव मराठे ज्वलर्स प्रा. लि. यांनी कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या किमतीवर ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेचे त्यांना वसुलीची नोटीस पाठवली आहे. प्रणव मराठे हे मराठेज्वलर्स-प्रणव  मराठे ज्वलर्स प्रा. लि. या दोन्ही भागीदारी संस्थाचे प्रत्येकी २० टक्के भागीदार आहेत, अशी माहिती सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी न्यायालयास दिली.

या गुन्ह्यात पोलिसानी प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे), कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४) आणि मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८, दोघे रा. कर्वेनगर) यांना अटक केली आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटक