शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:35 IST

निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देमशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत : प्रकाश आंबेडकरांचा आरोप  भंडारा गोंदियासाठी पुन्हा मतदान घ्यावे : प्रकाश आंबेडकर यांची मागणी 

पुणे : निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रणा यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज सुरु असलेल्या भंडारा गोंदिया येथील लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदार यंत्रातील बिघाडामुळे ३५ मतदान केंद्रांवरील प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.याशिवाय सकाळी काही ठिकाणच्या यंत्रणेत बिघाड झाला होता. 

      याबाबत आंबेडकर यांनी बोलताना सकाळी झालेल्या बिघाडामुळे मतदानाचा महत्वाचा वेळ वाया गेल्याचे म्हटले. या भागात तापमान ४७ ते ४७ अंश सेल्सियस असल्याने अनेकदा सकाळी अधिक मतदान होण्याची शक्यता होती. मात्र सुमारे १२ टक्के मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने न होणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर २२ तारखेला निवडणूक यंत्रणा सर्व मशीन वापरण्यायोग्य आणि सुस्थितीत असल्याचा दावा करत होती. मग 28 तारखेला इतके मशीन बंद कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामध्ये सरकार, निवडणूक आयोग आणि मशीन दुरुस्ती यंत्रणा यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जास्त मशीन बंद असलेला भाग आदिवासी वस्तीचा असून आदिवासी उमेदवार निवडून येवू नये म्हणून मशीन बंद पाडल्याची शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. हे सर्व बघता या भागात पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 

या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे.मतदान प्रक्रिया संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनीतालुक्यात तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन हजार 126 मतदान केंद्रांवर 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकPoliticsराजकारण