शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत आणि नारायण अय्यर यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:00 IST

या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे

पुणे : कांचनजुंगा (सुमारे ८,२०० मीटर) या प्रचंड शिखरावर महाराष्ट्रातील गिर्यारोहक नारायण अय्यर (वय ५२) यांचा निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उंचीच्या आजारामुळे गुरुवारी मृत्यू झाला. कॅम्प ४ सोडल्यानंतर काही वेळातच आजारी वाटूनही त्याने शिखर गाठण्याचा निर्धार केला होता. तर दुसऱ्या एका मोहिमेत गोक्यो येथे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत यांचा शुक्रवारी एक मृत्यू झाला. सावंत यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

महाराष्ट्रातील नारायणन अय्यर यांनी जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखराच्या शिखर बिंदूकडे जाताना ८,२०० मीटरवर गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. ५२ वर्षीय गिर्यारोहकाने गिर्यारोहण संपवताना आजारी पडल्यानंतरही खाली उतरण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. गिर्यारोहक मार्गदर्शकाने गिर्यारोहकाला वारंवार खाली उतरण्यास सांगितले पण अय्यरने त्यांच्या आवाहनाला नकार दिल्याचा शेर्पाने दावा केला आहे. पर्वतारोहण करणारे इतर गिर्यारोहक आता कॅम्पवरून बेस कॅम्पवर उतरत आहेत.

वाटेतच प्राणजोत मालवली

पृथ्वीवरील तिसऱ्या सर्वात उंच पर्वत आणि भारतातील सर्वात उंच पर्वत पुण्यातील मुळशी तालुक्यातील भगवान चवले आणि नारायणन अय्यर यांनी गुरुवारी (दि. ५) रोजी सायंकाळी ४.५२ वाजता कांचनजंगा शिखर (८५८६ मीटर) यशस्वीपणे सर केले होते. या टीमला खाली उतरण्यासाठी अजून किमान ६ तास लागणार होते. मात्र, वाटेतच नारायण अय्यर यांची प्राणजोत मालवली.

कांचनजुंगा शिखर चढाई करताना नारायणन यांचा झालेला मृत्यू अतिशय धक्कादायक व दुखःद आहे. अष्टहजारी शिखरांमध्ये चढाईच्या दृष्टीने कांचनजुंगा हे शिखर अतिशय खडतर व आव्हानात्मक आहे. येथील कॅम्प ४ ते शिखरमाथा ही चढाई तुलनेने मोठी आहे. त्यामुळे येथील आव्हानांमध्ये अधिक भर पडते.  आशा खडतर शिखरांवर चढाई करताना शिस्तबद्ध तयारी सोबतच डेथ झोन सारख्या ठिकाणी नेमकं कुठं थांबलं पाहिजे याची योग्य जाण असणं गरजेचं ठरतं. शुक्रवारी नारायणन यांच्या दुःखद बातमी सोबतच एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकवर डॉ. प्रज्ञा सावंत यांच्या मृत्यूची बातमी देखील आली. या दोन्ही घटना मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे मी दोन्ही गिर्यारोहकांच्या मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करतो. - उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईEverestएव्हरेस्ट