प्रभातचा पडदा २९ मे रोजी उघडणार!
By Admin | Updated: May 17, 2015 01:15 IST2015-05-17T01:15:51+5:302015-05-17T01:15:51+5:30
मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार ठरलेल्या प्रभात थिएटरचा पडदा या महिन्याच्या अखेरीस उघडणार आहे!

प्रभातचा पडदा २९ मे रोजी उघडणार!
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार ठरलेल्या प्रभात थिएटरचा पडदा या महिन्याच्या अखेरीस उघडणार आहे! चित्रपटगृहाच्या नूतनीकरणाचे कामकाज अंतिम टप्यात आले असून, थिएटरमध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीकरिता बंद ठेवण्यात आलेले प्रभात थिएटर पुन्हा दिमाखात २९ मेपर्यंत सुरू करण्याचे संकेत थिएटरचे मालक अजय किबे यांनी दिले आहेत. ‘किबे थिएटर’ याच नावाने चित्रपटगृह चालविण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.