सत्ताधा:यांचेच आंदोलन

By Admin | Updated: June 20, 2014 23:09 IST2014-06-20T23:09:59+5:302014-06-20T23:09:59+5:30

महापालिका प्रशासनाचे अधिकारी नागरिकांना दाद देत नसल्याचा प्रकार अनेकदा घडतो.

Power: Their agitation | सत्ताधा:यांचेच आंदोलन

सत्ताधा:यांचेच आंदोलन

>पुणो : महापालिका प्रशासनाचे अधिकारी नागरिकांना दाद देत नसल्याचा प्रकार अनेकदा घडतो. परंतु,  सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा व खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनाच  परिसरातील समस्या सोडविण्यासाठी अगतिक होऊन महापालिकेतील पदाधिका:यांसह आयुक्तांच्या दालनासमोर कचरा फेको आंदोलन शुक्रवारी करावे लागले. 
लोकमान्यनगर येथील रामबाग कॉलनी येथे अॅड. वंदना चव्हाण राहत आहेत. त्यांच्या शेजारी असलेल्या इमारतीत अनधिकृत टेरेसचे बांधकाम करून एक व्यावसायिक स्वयंपाक गॅस विक्रीचा बेकायदा व्यवसाय करीत आहे. याविषयी सहा महिन्यांपूर्वी अॅड. चव्हाण यांनी महापालिका अधिका:यांकडे तक्रार दिली. 
त्यानंतर कचरा आणि पाईपलाईन दुरुस्तीविषयी तक्रार दिली. मात्र, महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाने सत्ताधारी खासदारांनाही दाद दिली नाही. अखेर अॅड. चव्हाण यांच्यासह सभागृहनेते सुभाष जगताप, नगरसेवक व कार्यकत्र्यानी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांच्या दालनात घुसून कचरा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षारक्षक व कार्यकत्र्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्या वेळी दालनासमोर कचरा टाकून कार्यकत्र्यानी प्रशासनाचा निषेध केला. 
याविषयी अॅड. चव्हाण म्हणाल्या, ‘‘आमच्या घरासमोरील पाईपलाईन खोदाईचा खड्डा बुजविलेला नाही. झाडाच्या काढून टाकलेल्या फांद्या तशाच पडून आहेत. त्याविषयी कसबा-विश्रमबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार दिली. 
मात्र, अधिका:यांनी अद्याप दखल घेतली नाही. 
आमच्यासारख्या पदाधिका:यांना अधिकारी दाद देत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय हाल 
होत असतील, या विचाराने निषेधात्मक आंदोलन करून अधिका:यांवर कारवाईची मागणी केली आहे.’’(प्रतिनिधी)
 
सत्ताधा:यांचा
नाही वचक?
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे; त्यामुळे नागरी प्रश्नासाठी विरोधकांनी आंदोलने केली, तर त्यांची स्टंटबाजी म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी खिल्ली उडवतात. मग, प्रशासनावर सत्ताधा:यांच्या वचक नाही का, असे विचारले. त्यावर सभागृहनेते सुभाष जगताप म्हणाले,‘‘महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवत नसतील, तर या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार सत्ताधारी राष्ट्रवादीलाही आहे.’’
 

Web Title: Power: Their agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.