शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:40 IST

शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी

ठळक मुद्देशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

उंडवडी कडेपठार: गेल्या एक महिन्यापासून बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथील गावठाणात शेतीपंपाची थ्री फेज लाईन रोहिञ एक महिन्यापासून जळाल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ते तातडीने दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधितांशी संपर्क करुन माहिती दिली. आज दुरुस्ती होईल, उद्या दुरुस्ती होईल अशी उत्तरे संबधितांकडून शेतक-यांना मिळत आहेत. एक महिना होऊनही जळालेली रोहिञ दुरूस्ती करण्यात आली नाही. या जळालेल्या रोहिञावर जवळपास २२ शेतकऱ्यांचे कनेक्शन असून सध्या शेतीमध्ये मका,कडबा,भूईमुग पिक आहे. तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

तर काही पिके पूर्णपणे जळुन गेली आहे. त्याच बरोबर गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणच्या बोरवेल, विहिरींचे पाणी शेतकऱ्यांनी घरी पिण्यासाठी,जनावरांना पिण्यासाठी तसेच घरी वापरासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून आणले आहे. एक महिना होऊन देखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाची भरपाई महावितरणाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजPurandarपुरंदरFarmerशेतकरी