शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 02:56 IST

चार दिवसांत ८ घटना; मध्यवस्तीतील पुणेकर त्रस्त

पुणे : महापालिकेची रस्तेखोदाई व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) खोदकामामुळे गेल्या चार दिवसांत तब्बल आठ ठिकाणी महावितरणच्या ११ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याची घटना घडली. यामुळे स्वारगेट, टिळक रस्ता, सुभाषनगर परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे तब्बल ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणशी समन्वय न साधताच खोदाई केल्याने, वीजवाहिन्या तुटल्याचे महावितरणने सांगितले.शुक्रवारी (दि. १)देखील वीजवाहिनी तोडली गेल्याने दुपारी दोन वाजता सुभाषनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. तेथे सायंकळपर्यंत पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. सुमारे ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. तर, उर्वरित दोन रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पर्वती विभागातील स्वारगेट, टिळक रस्ता, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, चाटे कॉलनी, तहसील कार्यालय या परिसराला स्वारगेट व सुभाषनगर या दोन ११ केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या पुणे महापालिकेकडून नेहरू स्टेडियम येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. तसेच, महालक्ष्मी मंदिर ते सारसबागेदरम्यान ‘एमएनजीएल’कडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदकामात २९ जानेवारीपासून आत्तापर्यंत या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या वेगवेगळ्या आठ ठिकाणी तुटल्या. यात पुणे महापालिकेच्या खोदकामात पाच ठिकाणी, तर एमएनजीएलने केलेल्या खोदकामात तीन ठिकाणी वीजवाहिनी तुटली. सुभाषनगर वीजवाहिनी तीन ठिकाणी, तर स्वारगेट वीजवाहिनी पाच ठिकाणी तुटली. बहुतांश वेळा रात्रीच्या सुमारास हे प्रकार घडले आहेत.महावितरणचे अभियंते व कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटत आहेत.मात्र, महावितरणशी समन्वय न साधता सुरू असलेल्या या खोदकामांमुळे सुमारे ९ हजार ग्राहकांना नाहक फटका बसला असून, महावितरणचेदेखील आर्थिक नुकसान झाले आहे.गेल्या चार दिवसांत या दोन्ही वीजवाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा सुमारे १० तास खंडित राहिला.महावितरणकडून या प्रकाराबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात आले असून, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजPuneपुणे