शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

वालचंदनगर उपविभागात थकीत १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा केला खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:57 PM

येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे

लासुर्णे (पुणे): वालचंदनगर उपविभागातील सहा सेक्शनमधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेली पिके वाया जाणार आहेत. आगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच महावितरण कंपनीने 'शॉक' दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. तसेच या भागात जनावरांची संख्या आधिक आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे या भागातील पशुपालन व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

नितीन माने या शेतकऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. यात आणखी महावितरणने कृषी पंप बंद करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे जनावरांचा ओला चारा जळून जाणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय जो केला जातो तो देखील कोलमडणार आहे.

शरद जोशी विचार मंच प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून न्यायालयाच्या विरोधात घेतलेला आहे. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यास बारामती, पुणे व मुंबईचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.

उपविभागात १०६ कोटी थकबाकी आहे. कृषी योजनेतील माफ करुन भरावायाची थकबाकी व सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ च्या चालू बिलातील रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करावे.

-एम. व्ही. सुळ (वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता)

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीelectricityवीजmahavitaranमहावितरण