वीजचोरीला आळा घालणे गरजेचे
By Admin | Updated: July 10, 2015 01:06 IST2015-07-10T01:06:54+5:302015-07-10T01:06:54+5:30
दौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे.

वीजचोरीला आळा घालणे गरजेचे
मनोहर बोडखे, दौंड
दौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे. विद्युत महावितरण कंपनीने वीजचोरी प्रतिबंधक पथक कार्यरत करून हे पथक अधिक गतिमान करणे महत्त्वाचे आहे.
पूर्वी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात होती. त्या तुलनेत शहरातील वीजचोरी तुरळक असायची. मात्र, याउलट शहरात बहुतांशी ठिकाणी आकडे टाकून घरगुती वीज घेतली जात आहे. मात्र याचा उपद्रव वीज आकडा टाकणाऱ्या घराच्या जवळील प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना होत आहे.
आकडा टाकून वीज घेत असताना बऱ्याचदा तारेला तार चिकटली जाते आणि त्यातूनच आहे तो वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीजचोरी करणारा आकडा टाकण्याच्या प्रयत्नात इतरांचेदेखील नुकसान करतोच. मात्र, त्याच्या परिसरातील वीज ग्राहक त्याला प्रतिबंध करायला गेले तर तो उलट ‘चोरावर मोर ’या उक्तीप्रमाणे दादागिरीची भाषा करतो.
परिणामी विद्युत महावितरण कंपनीने शहरात कुठे कुठे आकडा टाकून वीज घेतली जाते. याची टेहळणी करून वीजचोरांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ही कारवाई करीत असताना कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे कारवाई करावी, या मागणीने जोर धरला आहे.